Trigrahi Yog in Scorpio : ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत जवळपास अडीच दिवसांपर्यंत राहतो. त्यामुळे चंद्राची दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती होते. अशातच आता १० डिसेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. जिथे मंगळ आणि सूर्य आधीच उपस्थित आहेत. त्यामुळे वृश्चिक राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. हा योग अनेक राशींसाठी खास ठरु शकतो. या योगाचा कोणत्या राशींना विशेष फायदा होणार आहे ते जाणून घेऊया.

मिथुन रास (Mithun Zodiac)

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : फक्त ३ दिवसानंतर या राशींचे बदलणार नशीब, शुक्र गोचरमुळे मिळणार अपार पैसा अन् धन
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
umber gets the blessings of Goddess Lakshmi
Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा, कधीही कमी पडत नाही पैसा
Budh Nakshatra Gochar 2024
Budh Nakshatra Gochar 2024 : बुध ग्रहाच्या नक्षत्र गोचरमुळे चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश

मिथुन राशीच्या तिसऱ्या स्थानी त्रिग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. विशेषत: विद्यार्थ्यांना अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करु शकतात. तसेच तुम्हाला कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकते. प्रशासकीय किंवा सरकारी नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. शत्रूंवर विजय मिळू शकतो. या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकते.

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या राशीमध्ये मंगळ, सूर्य आणि चंद्र यांची तिसऱ्या स्थानी युती होत आहे. त्यामुळे या योगाचा सकारात्मक प्रभाव कन्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पाहायला मिळू शकतो. व्यावसायिक जीवनात यश मिळाल्याने पगारही वाढू शकतो. आयातीशी संबंधित व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. या काळात विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो. कामानिमित्त प्रवासही घडू शकतो.

हेही वाचा- १२ वर्षांनी ‘दुर्लभ राजयोग’ घडून आल्याने नववर्षात ‘या’ राशींना सूर्यदेव करतील कोट्याधीश? कुणाचे येऊ शकतात अच्छे दिन

वृश्चिक रास (Vraschik Zodiac)

वृश्चिक राशीच्या लग्न स्थानी त्रिग्रह योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. तुम्हाला कायदेशीर बाबींमध्ये सहज यश मिळवून देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आदराचे स्थान मिळेल. करिअरच्या नवीन संधीही उपलब्ध होऊ शकतात. या काळात जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)