Jupiter Transit Gemini and Cancer: वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, देवगुरु १५ मे २०२५ रोजी वृषभ राशीतून बाहेर मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. यानंतर, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:५७ वाजता, गुरू मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करतील. यानंतर, ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८:३९ वाजता पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करतील. देवगुरुचे दोनदा राशी परिवर्तन करणे काही राशींसाठी लाभदायी ठरु शकते. त्यांना चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होऊ शकतो. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

देवगुरुच्या कृपेने ‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

मिथुन राशी (Mithun Zodiac)

देवगुरुचे दोनदा गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या राशीच्या लोकांना धनलाभाच्या अनेक संधी मिळू शकतात. प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकतो. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदण्याची शक्यता आहे. शुभ वार्ता मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते. या लोकांना धनलाभाच्या अनेक संधी वर्षभर मिळू शकतात. पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग दिसून येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी मोठी संधी मिळू शकते आणि आदर वाढू शकतो. या लोकांची लोकप्रियता वाढू शकते. आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात.

(हे ही वाचा : त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? सूर्य, शुक्र व बुधदेव येत्या ८ दिवसात ‘या’ मार्गाने देणार प्रचंड धनलाभाची संधी )

सिंह राशी (Leo Zodiac)

देवगुरुच्या दोनदा राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या राशीतील लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. देव गुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. कामात आणि योजनांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

तूळ राशी (Tula Zodiac)

देवगुरुचे दोनदा राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. गुरूच्या कृपेनं जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. जे काम हाती घ्याल, त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीची संधी देखील चालून येऊ शकते. या काळात आर्थिक आवक वाढल्यामुळं या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे. या काळात प्रगतीच्या नव्या संधी तुम्हाला मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. अनपेक्षित आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)