Moon-Mars Conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ग्रहांचा सेनपती मंगळ ग्रह १ जूनपासून मेष राशीत विराजमान आहे. पंचांगानुसार ३० जून सकाळी ७ वाजून ३४ मिनिटांनी मेष राशीत चंद्राचे राशी परिवर्तन झाले आहे. ज्यामुळे मेष राशीत आता मंगळ आणि चंद्राची युती निर्माण झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि मंगळ एकाच राशीत येतात तेव्हा ‘महालक्ष्मी योग’ निर्माण होतो, हा योग खूप शुभ मानला जातो. या योगामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते. या शुभ योगामुळे १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन

मंगळ आणि चंद्राची युती मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप खास ठरेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील मंगळ आणि चंद्राची युती खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल.

हेही वाचा: शनी करणार मालामाल! कुंभ राशीत होणार वक्री; पुढचे चार महिने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा

वृश्चिक

मंगळ-चंद्राची युती वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल घडवून आणेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope mars moon conjunction create mahalakshmi yoga you will earn a lot of money sap