वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक राशीवर एखाद्या ग्रहाचे अधिपत्य असते. तसेच, या एखाद्या राशीशी संबंधित लोकांचा स्वभाव, भविष्य आणि व्यक्तिमत्त्व काही प्रमाणात सारखे असू शकते. येथे आपण अशा राशींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्या प्रेमविवाहावर विश्वास ठेवतात. प्रेमविवाहाच्या बाबतीत हे लोक भाग्यवान मानले जातात. तसेच हे लोक आपल्या प्रिय व्यक्तीप्रती अतिशय निष्ठावान असतात. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • सिंह

या राशीच्या लोकांचा प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त असते. कोणतेही काम ते अतिशय काळजीपूर्वक करतात. त्याच वेळी, ते त्यांच्या जोडीदाराप्रती पूर्णपणे समर्पित असतात. हे लोक थोडे रागीट असले तरी ते काही वेळाने शांत होतात. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. यासोबतच हे लोक आपल्या पार्टनरसाठी तडजोडही करतात.

Numerology: खूपच नशीबवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; कुटुंबासाठीही ठरतात अत्यंत भाग्यवान

  • तूळ

प्रेमविवाहाच्या बाबतीत हे लोक भाग्यवान असतात. तसेच हे लोक रोमँटिक स्वभावाचे असतात. ते नेहमी आपल्या जोडीदाराला महत्त्व देतात. तसेच, त्यांच्या मनात प्रेमाबद्दल खूप विश्वास असतो. असे मानले जाते की ते त्यांचे प्रेम मिळविण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडू शकतात. या लोकांना लक्झरी लाइफ जगण्याचाही शौक असतो. त्यांना चांगले कपडे घालण्याची आवड असते. हे लोक थोडे विनोदी आणि मनमौजी स्वभावाचे असतात. त्यांना दबावाखाली काम करायला आवडत नाही. ते नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात. त्यांचे व्यक्तिमत्वही प्रभावी असते, त्यामुळे समोरची व्यक्ती त्यांच्यावर लवकर प्रभावित होते. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो त्यांना हे गुण देतो.

  • कन्या

या राशीचे लोकही प्रेमविवाहावर विश्वास ठेवतात. हे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात. त्यांच्या मनात त्यांच्या जोडीदाराप्रती नेहमीच समर्पणाची भावना असते. ते त्यांच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात, त्यामुळे ते प्रेमविवाहात यश मिळवू शकतात. आपल्या प्रेमाला आनंद देण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्याचबरोबर समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, जो त्यांना हे गुण देतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In terms of love marriage the people of this zodiac sign are lucky are very loyal to their partners are you in this too virgo leo libra pvp