Mars Transit in Aries: ज्योतिष मानणाऱ्या लोकांचं ग्रहांच्या गोचराकडे विशेष लक्ष असतं. कोणता ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे. त्याबरोबर वक्री आहे का? यावरून अंदाज बांधले जातात. काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर राशी बदल करतात. तर काही ग्रह अल्पावधीतच राशी बदल करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येत ग्रह त्याच्या निश्चित वेळी राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांचा सेनापती आणि पुत्र मंगळ ग्रह आज शनिवारी १ जून रोजी २०२४ ला राशी बदल करणार आहे. शास्त्रानुसार यंदा मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन अत्यंत खास असणार आहे. कारण मंगळ त्याचीच राशी असणाऱ्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया मंगळाच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींचे बदलेल भाग्य?

मेष राशी

मंगळदेवाच्या राशी परिवर्तनामुळे मेष राशींच्या लोकांना चांगला पैसा मिळू शकतो. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तसंच अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सुख सुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

(हे ही वाचा :तब्बल ३०० वर्षानंतर जुळून येतोय ‘महा दुर्लभ संयोग’; ६ दिवसांनी ‘या’ राशींची लागणार लाॅटरी? जीवनात असेल राजयोग!)

मिथुन राशी

मंगळदेवाच्या राशी परिवर्तनाने मिथुन राशीतील लोकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पैसे कमाई करण्याचे अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात. नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येऊ शकते.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना मंगळदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना या काळात पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करु शकता. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangal gochar 2024 mangal transit in mesh positive impact on these zodiac sing can get huge money pdb