Mars Transit 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचरचा थेट परिणाम राशी चक्रातील बारा राशींवर दिसून येतो. हे गोचर काही राशींसाठी शुभ ठरतात तर काही राशींसाठी अशुभ ठरतात. १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. वृषभ राशीमध्ये गुरु आधीच विराजमान असणार. त्यामुळे गुरू आणि मंगळ युती दिसून येईल. याचा फायदा काही राशीच्या लोकांना दिसून येईल. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या. (Mars Transit 2024 News in Marathi )

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष राशी

मंगळ मेष राशीच्या दुसऱ्या स्थानात युवा स्थितीत गोचर करणार. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि भाग्याचा ठरू शकतो. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या लोकांचे कुटुंब आनंदी राहील आणि हे लोक उच्च शिक्षण प्राप्त करण्यास यशस्वी राहतील. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. व्यवसाय आणि उद्योगामध्ये पैसा कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. या लोकांच्या आयुष्यात सुख समाधान लाभेल. या लोकांना समाजात मान सन्मान प्राप्त होईल.

हेही वाचा : २ ऑगस्ट पंचांग : जमीन व्यवहारात लाभ अन् व्यापारात जोखमीचा धोका, कुंभसह ‘या’ राशींनी घ्या सावध पवित्रा: सर्व राशींना कसा जाईल शुक्रवार?

वृषभ राशी

मंगळ वृषभ राशीच्या लग्न भावात आहे. हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे. या लोकांचे व्यक्तिमत्व उठून दिसेल. गुरू या लोकांच्या राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो ज्यामुळे या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. या लोकांना प्रयत्नाचे फळ मिळेल. हे लोक जमीन, वाहन खरेदी करू शकतात. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे लोक उत्तम जीवन जगतील.

हेही वाचा : २०२७ पर्यंत कमावणार पैसाच पैसा! शनीदेव करणार मीन राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ

कर्क राशी

मंगळने युवा अवस्थेत गोचर केल्यामुळे कर्क राशीला त्याचा फायदा दिसून येईल. या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. या राशीच्या लाभ स्थानामध्ये मंगळ विराजमान असल्यामुळे या लोकांना सुख समृद्धी लाभेल. या लोकांना धनसंपत्ती आणि पैसा कमावण्याच्या संधी मिळतील. या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा उत्तम काळ राहील. या काळात या लोकांना अनेक सुधारणा दिसून येईल. कुटुंब जीवनात सुख समृद्धी लाभेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangal gochar 2024 mars transit in yuvavastha these three zodiac signs will get money wealth ndj