Aries To Pisces Horoscope Today : आज १३ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी दुपारी ३ वाजून ५७ मिनिटांपर्यंत राहील. आज संपूर्ण दिवस आणि रात्र पार केल्यानंतर पहाटे ४ वाजून ३९ मिनिटांपर्यंत वैधृति योग जुळून येईल. तसेच आर्द्रा नक्षत्र सकाळी १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र जागृत होईल. राहू काळ पहाटे ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते सकाळी ९ वाजेपर्यंत असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याशिवाय आज पौष महिन्याची ‘शाकंभरी पौर्णिमा’ असणार आहे. शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो. १३ जानेवारी रोजी देवीचे नवरात्र पूर्ण होऊन उद्यापनाचा दिवस अर्थात पौष पौर्णिमा म्हणजे तथा शाकंभरी पौर्णिमा असणार आहे. त्याचबरोबर आज मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणारा भोगीचा सण आहे. ‘भोगी’ हा इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण आहे. या दिवशी सुगडाची पूजा करून भोगीची विशेष भाजी तयार करण्यात येते. आर्द्रा नक्षत्र, शाकंभरी पौर्णिमा आणि भोगी हा सण तुमच्या आयुष्यात कसं सुख घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…

१३ जानेवारी पंचांग व राशिभविष्य ( Mesh To Meen Horoscope) :

मेष:- अति उत्साह दाखवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल.

वृषभ:- वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मिथुन:- आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा.

कर्क:- लोकांच्या चर्चेचा विषय बनाल. मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका.

सिंह:- कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. घरगुती वातावरण शांत राहील.

कन्या:- जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

तूळ:- दिवस दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका.

वृश्चिक:- शांत डोक्याने काम करावे. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करावे. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात.

धनू:- विद्यार्थ्यानी संधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

मकर:- कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. जुगारातून लाभ संभवतो. एकावेळी अनेक गोष्टी हाताळू नका.

कुंभ:- काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका. आहारवर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल.

मीन:- व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakambhari purnima 2025 on 13 january aries to pisces which zodiac signs showered with love and wealth read horoscope in marathi asp