Kendra Yog: काही तासातच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. ग्रह आणि नक्षत्रानुसार, नवीन वर्ष खूप महत्त्वाचं असणार आहे. ग्रहांच्या राशी बदलामुळे असे अनेक राजयोग घडतील, ज्याचा फायदा अनेक राशींना होऊ शकतो. २०२४ हे वर्ष अनेक राशींच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम घेऊन येणारे ठरु शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, आता वर्षाच्या शेवटी ३० डिसेंबरला शनि आणि शुक्र ग्रहाचा ‘केंद्र योग’ जुळून आला आहे. शनि-शुक्राच्या केंद्र योगात असेल. दोन्ही ग्रह एकमेकांपासून केंद्रस्थानी असतील. असा शुभ योग जुळून आल्याने काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशी होतील मालामाल?

वृषभ राशी

केंद्र योग बनल्याने वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. या लोकांच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढू शकते. रखडलेले कामे मार्गी लागू शकतात. नोकरदारांना त्यांच्या मोहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नतीसह पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : Chanakya Niti: घरात गरीबी येण्याआधी मिळतात ‘हे’ ५ संकेत; तुम्हालाही दिसल्यास ओढावू शकते दारिद्र्य, वेळीच व्हा सावध! )

धनु राशी

नवीन वर्षात २०२४ मध्ये धनु राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. जीवनात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. हा शुभ योग तयार झाल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तुमची अनेक अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला जीवनात अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. 

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय शुभ ठरु शकतो. शनि आणि शुक्रदेवाच्या कृपेने प्रचंड धनलाभ होऊन उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक सौदे, गुंतवणूक आणि उत्पन्नाच्या बाबतीत नशीब तुमच्यासोबत असण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गाला चांगल्या संधी मिळू शकतात. आरोग्यासंबंधी असलेल्या समस्या दूर होऊ शकतात. संतती संबधी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख शांती आणि समाधान राहण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani and shukra make kendra yog positive impact on these three zodiac sign bank balance to raise money pdb