आज १४ जून रोजी राहू ग्रह नक्षत्र बदलणार आहे. सध्या राहू मेष आणि कृतिका नक्षत्रात आहे. शुक्र देखील मेष राशीत आहे आणि आता राहू शुक्राच्या मालकीच्या भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहे. अशा स्थितीत राहू आणि शुक्राचा हा दुहेरी योगायोग काही राशींसाठी अद्भूत काळ घेऊन आला आहे. या ग्रहांमध्ये मैत्रीची भावना असल्याने या ग्रहांच्या संयोगाने शुभ परिणामही मिळतात. २१ फेब्रुवारी २०२३ पर्यंत राहू या राशीत राहील आणि तोपर्यंत या राशीच्या लोकांना खूप लाभ होणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या.
- मेष :
राहू नक्षत्र बदलल्याने मेष राशीचे जीवन बदलेल. राहू शुक्रासोबत मेष राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांवर याचा सर्वाधिक परिणाम होईल. मेष राशीच्या लोकांना राहु अमाप संपत्ती देईल. त्यांचे रखडलेले पैसे त्यांना मिळतील. उत्पन्न वाढेल. नवीन मार्गाने पैसे मिळतील. कामात यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ शुभ आहे. प्रगतीची दाट शक्यता निर्माण होईल.
सर्वोत्कृष्ट मुलगा आणि जावई सिद्ध होतात ‘या’ राशीची मुलं; सर्वांचे मन जिंकण्यात असतात पटाईत
- वृषभ :
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि राहू शुक्राच्या मालकीच्या भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहे, ही स्थिती वृषभ राशीच्या लोकांसाठीही खूप शुभ असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना हा काळ नवीन नोकरी देईल. तुम्हाला मोठे पद मिळू शकते. उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रतिष्ठा वाढेल.
Numerology : जाणून घ्या, मूलांक आणि भाग्यांक म्हणजे काय आणि ते कसे शोधले जातात?
- तूळ :
तूळ राशीच्या लोकांसाठी राहूचे नक्षत्र बदल खूप शुभ राहील. या राशीचा स्वामी देखील शुक्र आहे आणि राहू शुक्राशी अनुकूल असल्यामुळे तो आपल्या राशीच्या लोकांना संपत्ती आणि वैभव देईल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. जीवनात सुख-समृद्धी वाढेल. बढती-वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामेही आता पूर्ण होणार आहेत.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)