हिंदू धर्मात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत, ज्या दान करणे चुकीचे मानण्यात आले आहे. या गोष्टींचे दान केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते. स्वयंपाकघर हे आपल्या घराचा मुख्य भाग असतो. इथे अन्नपूर्णा देवी वास्तव्य करते, असा समज आहे. त्यामुळे तुम्हाला स्वयंपाकघरातील पावित्र्य टिकवून ठेवायचे असेल तर वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या करणे टाळल्या पाहिजेत. वास्तु शास्त्रींच्या सल्ल्यानुसार, स्वयंपाकघरातील कोणत्या चार गोष्टी आहेत, ज्या दान करणे टाळले पाहिजे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) मोहरीचे तेल

ज्योतिषशास्त्रानुसार, मोहरीचे तेल शनि ग्रहाशी संबंधित मानले जाते. यामुळे स्वयंपाकघरातून मोहरीचे तेल कधीही संपू देऊ नये. हे तेल संपले तर शनिदेवाचा कोप वाढतो असे म्हटले जाते, त्यामुळे तेल संपण्यापूर्वी नवे तेल डब्ब्यात भरून ठेवा. याशिवाय मंगळवार आणि शनिवारी घरात मोहरीचे तेल आणू नये आणि या दोन दिवशी मोहरीचे तेल दान करू नये, असे सांगितले जाते.

२) मीठ

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातून मीठ कधीही संपू देऊ नका. मीठ संपले तर अशुभ ग्रह राहूची दृष्टी तुमच्यावर पडू शकते. तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. कारण ज्योतिषशास्त्रात मीठाला राहूचा पदार्थ मानले जाते. याशिवाय चुकूनही मिठाचे दान करू नये किंवा कोणाकडून उधार घेऊ नये.

हेही वाचा – Chanakya Niti : ‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे पती-पत्नी कधीच नसतात सुखी; घटस्फोट होण्याची असते शक्यता

३) तांदूळ

ज्योतिषशास्त्रानुसार, तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो. जर तुमच्या घरात तांदूळ संपला असेल, तर तुमच्या घरात अशुभ प्रभाव असल्याचे दिसून येऊ शकतो, ज्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडण सुरू होऊ शकतात. वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात. स्वयंपाकघरातून तांदूळ कधीही संपण्याचा प्रयत्न करू नका. याशिवाय तांदूळ दान करणे तेव्हाच उत्तम असते, जेव्हा तुमच्याकडे भरपूर तांदूळ असतो.

४) हळद

औषधी गुणधर्म असलेली हळद केवळ आपल्या जेवणाला रंगच देत नाही तर त्यामध्ये आढळणारे प्रतिजैविक तत्व आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण ज्योतिषशास्त्राबद्दल बोललो तर हळद देवगुरु बृहस्पतीशी संबंधित असल्याचे मानले जाते. जर तुमच्या घरातील हळद संपली तर ते गुरु दोषाचे लक्षण मानले जाते. घरात गुरु दोष असेल तर धनहानी सुरू होऊ शकते. हळद नसल्यामुळे करिअरमधील यश अपयशात बदलू शकते, त्यामुळे हळद घेऊ नये आणि चुकूनही हळद कोणालाही देऊ नये.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu tips for kitchen never give turmeric and these 4 things to other from your kitchen according to vastu shastra sjr