दिनांक १६, १७ हे दोन दिवस अनुकूल नाहीत, त्यामुळे हे दोन दिवस कोणतेही निर्णय घेताना विचार करा. जमणार आहे अशाच गोष्टींचा नाद करा. ज्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होणार आहे अशा गोष्टींच्या नादी लागू नका. एखाद्याला तुमचा सल्ला पटेल किंवा न पटेल, पण या दिवसांत तरी तो कोणाला द्यायला जाऊ नका. इतरांनी काय करावे यापेक्षा स्वत:ला काही करायचे आहे ते ठरवा. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये चांगल्या घडामोडी घडतील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात तांत्रिक अडचणी आल्या तरी त्यावर पर्यायी मार्ग मिळेल. खर्च जपून करा. समाजसेवेची आवड राहील. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. जोडीदाराची मदत मिळेल. धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्याल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ दिनांक : १४, १८
महिलांसाठी : जबाबदारी दुसऱ्यांवर सोपवू नका.