समुद्र विज्ञानातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे ‘स्क्रिप्स सागरीविज्ञान संस्था’ येथे जाऊन प्रशिक्षण घ्यावे हे स्वप्न असते. हे संपूर्ण जगातील सर्वात जुने आणि भव्य केंद्र अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅनडिएगो येथे १९०३ साली स्थापन करण्यात आले आणि ते सॅनडिएगो विद्यापीठाच्या अखत्यारीत आहे.