अंकिता पाटील
अंकिता पाटील ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाइल, हेल्थ, करिअर, रेसिपी, तंत्रज्ञान, ऑटो, राशीवृत्त यासंदर्भातल्या बातम्या त्या करतात. त्यांनी साठये कॉलेजमधून पदवी घेतली आणि ‘मुंबई मराठी पत्रकार संघातून’ पत्रकारितेचा कोर्स केला आहे. पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र १’ या युट्युब चॅनेलमध्ये इंटर्नशिप करून केली होती. त्यानंतर त्यांनी ‘इट्स मज्जा’, ‘एडिट इट मिडिया’ या युट्युब चॅनेलमध्ये ‘डेस्क रिपोर्टर’ म्हणून काम केलं आहे. त्यांनी स्क्रिप्ट रायटिंग, अँकर व्हिडीओ, व्हिडीओ एक्सप्लेनर, व्हॉईस-ओव्हर, स्पेशल इंव्हेट रिपोर्टींग अशा प्रकारची कामे युट्युब चॅनेलसाठी केली आहेत. एकूणच त्यांच्याकडे साडे तीन वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. आता सध्या लोकसत्ता डॉट कॉममध्ये त्या २०२३ पासून कार्यरत आहेत. चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. अंकिता पाटील यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.