स्वाती चिकणे-पिंपळे या लोकसत्ता डॉट कॉममध्ये सिनिअर सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. सामाजिक, ट्रेंडिंग, आरोग्य या विषयावर लिखाणाची त्यांना आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली आहे. शिवाय फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा केला आहे. आयबीएन लोकमतच्या इंटर्नशिपपासून करियरला सुरुवात केली आणि त्यानंतर सकाळ समूहाच्या साम या वृत्तवाहिनीमध्ये आउटपुट डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर विविध क्षेत्रातील कंपन्यांसाठी त्यांनी Regional PR Head म्हणून काम केले. यादरम्यान त्यांनी लोकसत्ता वास्तुरंगसाठी आणि पुढारी वृत्तपत्रासाठी देखील लिखाण केले आहे. त्यानंतर सारांश नावाच्या एका मराठी न्यूज अॅपसाठी त्यांनी संपादक म्हणून काम केले आहे. त्यानंतर टाइम्स नाऊ मराठी या वेबसाईट साठी freelancing केलं आहे. लोकसत्ता डॉट कॉम मध्ये येण्याआधी त्या एका पुस्तक प्रकाशन कंपनीत एडिटर म्हणून काम करत होत्या.
त्यांना संगीत, खाद्य आणि फोटोग्राफीची आवड आहे. तसंच सामाजिक विषयांवर काम करण्याची त्यांना आवड आहे.
एकूण अनुभव – १० वर्षे
पूर्वीचा अनुभव – सकाळ समूह (साम वृत्तवाहिनी), Regional PR Head, सारांश, टाइम्स नाऊ मराठी, पुस्तक प्रकाशन कंपनी
लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२५ पासून कार्यरत.
स्वाती चिकणे-पिंपळे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.