Flipkart Black Friday Sale Offer TVS iQube On Disscount : दमदार ड्रायव्हिंग रेंज आणि चांगला टॉप स्पीड असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगणार आहोत, ज्याच्यावर फ्लिपकार्टच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये खास डील सुरू आहे. TVS iQube ही भारतातील तिसरी सर्वांत लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी सध्या फ्लिपकार्टवर १,०७,२९९ रुपयांना उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्हाला पर्ल व्हाईट आणि वॉलनट ब्राऊन असे रंग पर्याय मिळणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही बचत कशी करायची? या ऑफरचा लाभ कुठून घ्यायचा जाणून घेऊ..

तर फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये (Flipkart Black Friday Sale) तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहात.

हेही वाचा…Mahindra BE 6e : महिंद्राची २० मिनिटांत चार्ज होणारी SUV मार्केटमध्ये दाखल; पहिल्यांदा रजिस्टर करणाऱ्याला बॅटरी वॉरंटीची ऑफर; वाचा किंमत

टीव्हीएस आयक्यूब २.२ केडब्ल्यूएच डिस्काउंट ( TVS iQube 2.2 kWh discount) :

फ्लिपकार्ट कंपनी iQube 2.2 kWh मॉडेलवर पाच हजार रुपयांहून अधिक सूट देत आहे (Flipkart Black Friday Sale). टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटरवर EMI पर्यायांसह विविध सवलती मिळणार आहेत. बँके क्रेडिट कार्ड युजर्सना सहा हजार रुपयांपर्यंतची सूट आणि डेबिट कार्ड युजर्सना दोन हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. एचडीएफसीसारख्या आघाडीच्या बँकांकडून मिळणाऱ्या ३६ महिन्यांपर्यंतच्या कर्जाच्या मुदतीसह तुम्ही EMI योजनादेखील निवडू शकता. या सगळ्या गोष्टी एकत्र करून, तुम्ही iQube 2.2 kWh कमीत कमी म्हणजे १,०१,९३४ रुपयांमध्ये घरी आणू शकता.

फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल : टीव्हीएस आयक्यूब २.२ केडब्ल्यूएच (Flipkart Black Friday Sale)

एंट्री-लेव्हल iQube ही स्कूटर ५.९ bhp च्या आउटपुटसह २.२ केडब्ल्यूएच kWh बॅटरीद्वारे दोन तास आणि ४५ मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज होते. TVS च्या मते, इकॉनॉमी मोडमध्ये iQube ची रेंज ७५ किमी आणि पॉवर मोडमध्ये ६० किमी आहे. त्यात सर्व एलईडी लाईट्स आणि 5-इंचाचा TFT डिजिटल डिस्प्लेही आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart black friday sale offer tvs iqube disscount here are the price and offer and other details asp