दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी KIA मोटर्सने दीर्घ प्रतीक्षेनंतर जागतिक स्तरावर आपली नवीन एमपीवी किआ करेन्स (MPV Kia Currens) चे अनावरण केले आहे. किआ मोटर्सचा दावा आहे की ही एमपीवी (MPV) सुरक्षिततेच्या बाबतीत तसेच लुक्स आणि फीचर्सच्या बाबतीत इतर गाड्यांपेक्षा सरस ठरेल. त्याच वेळी, किआ मोटर्स १५ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतात करेन्स एमपीवी लाँच करण्याची तयारी करत आहे. याआधी या कारच्या वैशिष्ट्यांसह सुरक्षा फीचर्सबद्दल जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किआ करेन्सचा बाह्य भाग

किआ मोटर्सच्या या एमपीवीला हाय-टेक स्टाइलिंग एक्सटीरियर मिळते. ज्यांच्या पुढच्या भागात वाघाच्या एका अनोख्या चेहऱ्याची रचना करण्यात आली आहे. त्याच वेळी, या एमपीव्हीमध्ये इनटेक ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स बसवण्यात आले आहेत. त्याच वेळी, किआ करेन्सची लांबी 4540mm, रुंदी 1800mm आणि उंची 1700mm आहे. जे एमपीवीच्या आत उत्तम स्पेस देते.

( हे ही वाचा: Petrol- Diesel Price Today: आजही महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर शंभरी पार, डिझेलचे भाव झाले कमी; जाणून घ्या इंधनाचे दर )

किआ करेन्सचे इंटिरिअर

किआ मोटर्सच्या या एमपीव्हीचे बाह्य भाग जितका छान आहे तितकाच इंटिरिअर उच्च-तंत्रज्ञानासह सुरक्षित वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. किआ करेन्समध्ये ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग, मल्टिपल एअरबॅग्ज, १०.२५ इंच ऑडिओ व्हिडीओ नेव्हिगेशन टेलीमॅटिक्स (AVNT) डॅश बोर्डच्या मध्यभागी आहे, जे आधुनिक टच देते.

( हे ही वाचा” Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांमध्ये असतो पैसे कमविण्याचा जास्त ध्यास, करिअरमध्येही मिळते लवकर यश )

किआ करेन्सची सुरक्षा फीचर्स

या एमपीव्हीमध्ये ६ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, रियर पार्किंग सेन्सर्स आणि डिस्क ब्रेक्स, एअर प्युरिफायर, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, यासह अनेक मानक आणि सुरक्षितता फीचर्स आहेत.

( हे ही वाचा: Reliance Jio चा मोठा धमाका! आता करा फक्त १ रुपयाचा रिचार्ज, आहे ३० दिवसांची वैधता )

किआ करेन्सचे संभाव्य इंजिन

किआ या एमपीव्हीमध्ये १.५ लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देऊ शकते. जे 115bhp पॉवर आणि 144Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच डिझेल इंजिनमध्ये १.५ लीटर डिझेल इंजिनही दिले जाऊ शकते. जे 115bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करू शकते. त्याचबरोबर या एमपीव्हीमध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ६ स्पीड iMt आणि ७ स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kias new car carens suv and mpv mixed package find out what are the features ttg