जुने वाहन विकल्यावर तात्काळ बंद करा तुमचं फास्टॅग अकाउंट; अन्यथा बसू शकतो मोठा फटका

जर आपण आपले जुने वाहन विकले असेल आणि आपण आपला फास्टॅग ब्लॉक केला नसेल तर आपल्याला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

fastag
टोल नाक्यांवर नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने संपूर्ण देशात फास्टॅग अनिवार्य केले होते. (Photo: Financial Express)

टोल नाक्यांवर नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने संपूर्ण देशात फास्टॅग अनिवार्य केले होते. यानंतर बहुतांश सर्व चारचाकी वाहने आणि व्यावसायिक वाहनांमध्ये फास्टॅगचा वापर केला जात आहे. हा फास्टॅग आपल्या बँकेच्या खात्यासोबत लिंक असतो आणि याच्या मदतीने टोलचे पैसे आपल्या खात्यातून कापले जातात. ही यंत्रणा वेळ वाचवणारी असली तरीही जर आपण आपले जुने वाहन विकले असेल आणि आपण आपला फास्टॅग ब्लॉक केला नसेल तर आपल्याला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर जाणून घेऊया आपण आपले फास्टॅग अकाउंट कसे ब्लॉक करू शकतो.

फास्टॅगमुळे कसे होते नुकसान ?

फास्टॅग हे अधिकृत जारीकर्ता किंवा बँकेकडून खरेदी केले जाते. हे तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असते. अशावेळी जर तुम्ही गाडी विकताना तुमचं फास्टॅग ब्लॉक केलं नसेल तर वाहनाचा नवीन मालक याचा वापर करू शकतो. जेव्हाही ते वाहन टोलनाक्यावरून जाईल तेव्हा तुमच्या खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल. त्यामुळे वाहन विकताना फास्टॅग ब्लॉक करणं अतिशय गरजेचं आहे.

फास्टॅग अकाउंट कसे बंद करावे ?

केंद्र सरकारच्या १०३३ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केल्यास फास्टॅगशी संबंधित तुमच्या सर्व तक्रारींचे निवारण केले जाईल. तसेच, तुम्हाला फास्टॅग अकाउंट बंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सांगितली जाईल. याशिवाय, तुम्ही तुमच्या सेवा प्रदात्याच्या कस्टमर केअरला कॉल करूनही फास्टॅग अकाउंट बंद करू शकता. खालील क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमचे फास्टॅग अकाउंट बंद करू शकता.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) – १८० ०२१०० १०४

पेटीएम (PayTm) – १८० ०१२०४ २१०

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) – १८० ०४१९८ ५८५

एचडीएफसी बँक (HDFC Bank) – १८० ०१२०१ २४३

एरटेल पेमेंट्स बँक (Airtel Payments Bank) – ८८० ०६८८ ००६

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know why it is important to deactivate your fastag after selling your old vehicle pvp

Next Story
Video: सरड्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात रंग बदलते BMW ची इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या
फोटो गॅलरी