Mahindra Thar 5 Door Variant: ऑफ रोड एसयूव्ही महिंद्रा थार ही एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. लांब प्रवासाची आणि अँडव्हेंचर्सची आवड असलेल्या लोकांची पसंती आहे. या एसयूव्हीचे यश आणि ग्राहकांची मागणी पाहता कंपनी लवकरच ५ डोअर व्हेरिएंट लाँच करणार आहे. कंपनी या ‘महिंद्रा थार’चा ५ डोअर प्रकार लाँच करण्याची आता तारिखही समोर आली आहे. महिंद्रा कंपनी जानेवारीत होणाऱ्या ऑटो एक्सपो २०२३ मध्ये सहभागी होणार नसून कंपनी २६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपली ५ डोअर महिंद्रा थार कार लाँंच करणार आहे. या कारची विक्री पुढच्या वर्षीच्या उत्तरार्धात होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिंद्रा थार ५ डोअर व्हेरियंटमध्ये काय असेल खास?

महिंद्रा थार ५ डोअर व्हेरियंटमध्ये, कंपनी सध्याच्या एसयूव्हीमध्ये आढळलेली तीच वैशिष्ट्ये देण्याची शक्यता आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हॅलोजन हेडलॅम्प, इलेक्ट्रिक ऑपरेटर एसी, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, इन्स्ट्रुमेंट यांचा समावेश आहे. क्लस्टर, काढता येण्याजोगे छप्पर. पॅनेल, ड्युअल एअरबॅग्ज, ABS, EBD,पार्किंग सेन्सर्स आणि फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या फिचर्सशिवाय कंपनी यामध्ये व्हॉईस कमांड, नेव्हिगेशन, जिओ फेन्सिंग सारखे फिचर्स देखील देऊ शकते.

(आणखी वाचा : जुन्या टू-व्हीलरचं आता नो टेन्शन! ‘इतक्या’ कमी खर्चात EV मध्ये होणार कन्वर्ट; जाणून घ्या कसं? )

महिंद्रा थार ५ डोअर व्हेरियंटचा टक्कर थेट फोर्स गुरखा आणि ऑफ रोड एसयूव्ही सेगमेंटमध्ये लवकरच लॉन्च होणार्‍या Maruti Jimny 5Door शी होणार.

महिंद्रा थार ५ डोअर व्हेरियंटची किंमत किती?

महिंद्रा ५ डोअर व्हेरियंटची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा सुमारे १ ते २ लाख रुपये जास्त असू शकते. रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा १५ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच करू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra thar 5 door variant will be launched on january 26 pdb