तुम्ही महाराष्ट्रात नवीन बाईक किंवा कार खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर त्याची नोंदणी लवकरात लवकर करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे वाहन भारतीय रस्त्यावर कायदेशीररीत्या चालविण्यासाठी तुम्ही जवळच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात त्याची नोंदणी करायला हवी. महाराष्ट्रात ५० हून अधिक प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. याचा अर्थ तुम्ही त्वरित जवळच्या कार्यालयात जाऊन RTO डेटाबेसमध्ये तुमच्या कारची नोंदणी करू शकता. तुम्ही असे करण्यात अयशस्वी झाल्यास, वैध नोंदणी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविल्याबद्दल तुमच्या नावावर ई-चलन जारी केले जाईल. तुम्हाला RC बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास पुढे काही सोप्या पायऱ्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नोंदणी प्रमाणपत्र, ज्याला व्हीआरसी किंवा आरसी, असेही म्हणतात. हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे; जे तुमचे वाहन सरकारी डेटाबेसमध्ये नोंदणीकृत असल्याचे प्रमाणित करते. हे वाहनाच्या कायदेशीर मालकाची पुष्टीदेखील करते आणि वाहनाशी संबंधित महत्त्वाची माहिती प्रदान करते. जसे की, त्याचे मेक, मॉडेल, वर्ग, इंधन प्रकार, चेसिस नंबर व बरेच काही. तुम्ही तुमच्या वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरून पीयूसी एक्स्पायरी डेट, आरसी स्टेटस व इन्शुरन्स एक्स्पायरी डेटदेखील तपासू शकता. वाहन आणि मालकाबद्दलची महत्त्वाची माहिती यात असते. विशेषत: जेव्हा तुम्ही सेकंडहॅण्ड वाहन खरेदी करत असाल किंवा तपासणीच्या उद्देशाने वाहन तपशील मिळवू इच्छित असाल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newly purchased vehicle motorcycle or car all you need to know about registration certificates in maharashtra details asp
First published on: 23-05-2024 at 17:52 IST