Skoda कंपनीने आपली आणखी एक एसयूव्ही लॉन्च केली आहे. स्कोडा कंपनीने Kodiaq ही एसयूव्ही लॉन्च केली आहे.ही एसयूव्हीजबरदस्त फीचर्स आणि इंजिनसह ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. ही एसयूव्ही आता BS6 फेज 2 शी अनुरूप आहे. पाहिल्याप्रमाणेच ही एसयूव्ही तीन ट्रिम लेव्हलमध्ये ऑफर केली गेली आहे. कंपनीने २०२३ साठी कोडियाकचे भारतातील उत्पादन ३,००० युनिट्सपर्यंत वाढवले आहे. जे मागच्या वर्षांमध्ये १,२०० युनिट्स इतके होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्कोडा कोडिएकचे इंजिन

स्कोडा कोडीएकमध्ये पाहिल्याप्रमाणेच इंजिन देण्यात आले आहे. जे २.० लिटरचे टर्बो इंजिन होते. जरी इंजिन आता पूर्वीपेक्षा ४.२ टक्के फ्युअल एफिशिएंट आहे. हे इंजिन १९० बीएचपी आणि ३२० एनएम टॉर्क जनरेट करते. याला ७-स्पीड DSG ने कनेक्ट करण्यात आले आहे. ही एसयूव्ही केवळ ७.८ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास इतका स्पीड पकडते. हे डायनॅमिक चेसिस कंट्रोलसह येते जे कारला १५ मिमी पर्यंत वाढवू किंवा कमी करू शकते.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 14 May: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले? पाहा तुमच्या शहरातील आजच्या किमती

फीचर्स

2023 Skoda Kodiaq मध्ये आता डोर-एज प्रोटेक्टर आहेत जे दरवाजे उघडल्यावर आपोआप active होतात. नवीन लाउंज स्टेपसह मागील सीटचा आराम भाग वाढविला गेला आहे. या एसयूव्हीमध्ये वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह ८.० इंचाचा इंफोटेनमेंट डिस्प्ले मिळतो. जो पहिल्यासारखाच आहे. टॉप-स्पेक लॉरिन अँड क्लेमेंट (L&K) ट्रिममध्ये कॅंटन १२ -स्पीकर ऑडिओ सिस्टमसह येते. तसेच या एसयूव्हीमध्ये ग्राहकांना ८ इंचाचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. मात्र हाय ट्रीममधील एसयूव्हीमध्ये १०. २५ इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते.

सेफ्टी फिचर्स

Skoda Kodiaq मध्ये ५ स्टार युरो NCAP क्रॅश सुरक्षा रेटिंगच्या पहिल्या संस्थांनी आहे. त्यामुळे यामध्ये ९ एअरबॅग्स येतात. इतर फीचर्समध्ये स्टॅबिलिटी कंट्रोल, मल्टी-कॉलिजन ब्रेकिंग आणि हँड्स-फ्री पार्किंगचा समावेश होतो.

हेही वाचा : Hyundai ने ‘या’ प्रीमियम हॅचबॅक कारचे केले जागतिक पदार्पण, जाणून घ्या भारतात कधी होणार लॉन्चिंग?

किंमत

स्कोडा कंपनीने आपली ही एसयूव्ही नवीन अवतारामध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये ग्राहकां जबरदस्त इंजिन आणि तगडे फीचर्स मिळणार आहेत. कंपनीने याची एक्सशोरूम किंमत ही ३७.९९ लाख रुपये इतकी ठेवली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skoda launch kodiaq suv in new design and powerful engine and features check price details tmb 01