टू व्हीलर सेक्टरच्या स्कूटर सेगमेंटमध्ये स्पोर्टी डिझाईन्ससह मायलेज देणार्‍या स्कूटर्सची मागणी अधिक आहे. तुम्हाला मायलेज देणारी स्टायलिश स्कूटर विकत घ्यायची असेल, तर तुम्ही या सेगमेंटच्या दोन लोकप्रिय स्कूटरची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या तुलनेसाठी, आमच्याकडे TVS Ntorq आणि Yamaha Ray ZR 125 आहेत. या स्कूटरच्या किमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण तपशीलांबद्दल माहिती देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

TVS Ntorq 125: टीव्हीएस एनटॉर्क कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरच्या यादीत आहे. टीव्हीएसने या स्कूटरचे पाच प्रकार बाजारात आणले आहेत. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात १२४.८ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे १०.२ पीएस पॉवर आणि १०.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. टीव्हीएस एनटॉर्क स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर ५६.२३ किमीचा मायलेज देत असून ARAI ने प्रमाणित केले आहे. टीव्हीएस एनटॉर्क 125 ची सुरुवातीची किंमत ७५,४४५ रुपयांपासून सुरू होते. टॉप मॉडेलवर ८७,५५० रुपयांपर्यंत जाते.

TVS Ntorq 125 vs Yamaha Ray ZR 125: मायलेज आणि किमतीत कोणती स्कूटर वरचढ, जाणून घ्या

Yamaha Ray ZR 125: यामाहा रे झेडआर 125 ही आकर्षक डिझाइन केलेली स्कूटर आहे. यामाहाने पाच प्रकारांसह लॉन्च केली आहे. हे सिंगल-सिलेंडर १२५ सीसी इंजिनद्वारे समर्थित असून ८.२ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक बसवण्यात आला आहे. यामाहा कंपनीचा दावा आहे की, यामाहा रे झेडआर 125 स्कूटर ६६ किमीचा मायलेज देत असून मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. यामाहा रे झेडआरची सुरुवातीची किंमत ७६,८३० रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटवर ८३,८३० रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs ntorq 125 vs yamaha ray zr 125 know the price and features rmt
First published on: 27-01-2022 at 13:20 IST