लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मुदत विमा अर्थात टर्म प्लॅन हे पॉलिसीधारक आणि कुटुंबीयांना अत्यंत कमी किमतीत दीर्घकालीन हमी आणि फायदे प्रदान करतात. मात्र तो खरेदी करताना ‘सर्वांसाठी एकच’ असा नियम लागू पडत नाही हे ध्यानांत घेऊन, गरजा, कुटुंबातील अवलंबितांचे स्वरूप पाहून पुरेसे विम्याचे संरक्षण घेण्याकडे अजूनही ध्यान दिले जात नसल्याचे आढळून येते.

मुदत विम्याचा प्रीमियम (हप्ता) हा एकूण कवचाच्या (सम अश्युअर्ड) रकमेवर आधारित असतो. जास्त रकमेचे कवच असेल तर प्रीमियम जास्त असतो. पण प्रीमियम परवडणारे बनवण्यासाठी कवच कमी करणे योग्य निर्णय ठरणार नाही. असे बजाज अलायन्स लाइफ इन्शुरन्सचे नियुक्त विमागणिती (ॲक्च्युअरी) अवधेश गुप्ता यांनी सांगितले. या संबंधाने साधा नियम म्हणजे विम्याचे किमानतम कवच हे पॉलिसीधारकाच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा १० पट असावे. तेवढे विम्याचे संरक्षण मिळविण्यासाठी प्रीमियम खर्च जुळविताना अनावश्यक खर्चांना कात्री लावणे श्रेयस्कर ठरेल.

योग्य पॉलिसीच्या निवडीत प्रीमियम रक्कम हा महत्त्वाचा घटक आहे, कारण हा दीर्घावधीचा खर्च आहे. प्रीमियम भरण्यात अडचण आल्यास पॉलिसी व्यपगत होऊ शकते. म्हणूनच, आर्थिक ऐपतीत बसणारी पॉलिसी निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे गुप्ता यांनी सूचित केले. कुटुंबाच्या आर्थिक नियोजनांत कर्त्याचा मुदत विमा ही पहिली महत्त्वाची पायरी आहे. हे नियोजन चांगल्या प्रकारे केले गेल्यास आणि प्रीमियममधील खंड पडण्याची शक्यताही टळेल, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Growing trend towards term plans need to choose wisely print eco news amy