नेव्हल आर्मामेंट डेपो, मुंबई येथे फिटर्ससाठी १४ जागा
अर्जदारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. फिटर विषयातील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य चाचणी परीक्षा उत्तीर्ण  असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ जुलै २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली नेव्हल आर्मामेंट डेपो, मुंबईची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने जीपीओ पोस्ट बॉक्स नं. ३६१, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०१४.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी ६४ जागा

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांनी अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, हॉकी, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, बॅडमिंटन, टेबलटेनिस, भारोत्तोलन, बुद्धिबळ यांसारख्या क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जुलै २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली पश्चिम रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा पश्चिम रेल्वेच्या www.wr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १२ ऑगस्ट २०१४ पर्यंत अर्ज करावेत. फिशरीज सव्र्हे ऑफ इंडियामध्ये सीनिअर सायंटिफिक असिस्टंटच्या ८ जागा अर्जदार सामुद्रिक जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, मत्स्य विज्ञान वा मत्स्य-व्यवस्थापन यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जुलै २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज क्षेत्रीय विदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पश्चिम क्षेत्र, प्रतिका भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर १४ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.

बँक नोट प्रेस- देवास येथे ज्युनिअर टेक्निशियनच्या ५० जागा

अर्जदारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रिंटिंग प्लेट-मेकिंग, लेटर प्रेस वा इलेक्ट्रोप्लेटिंग या संदर्भातील पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जुलै २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली बँक नोट प्रेस, देवासची जाहिरात पाहावी अथवा www.bnpdewas.spmcil.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, बँक नोट प्रेस, देवास (म. प्र.) ४५५००१ या पत्त्यावर १४ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.

 केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘संयुक्त संरक्षण निवड परीक्षा : २०१४’ अंतर्गत ५६४ जागा

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत तसेच ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ जुलै २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या  www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१४.         

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New job openings