ब्रिटनने स्थलांतरितांचं प्रमाण कमी करण्याकरता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युकेमध्ये विद्यार्थी अवलंबित अर्जांमध्ये ८० टक्के घट झाली आहे, अशी माहिती ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिली. त्यांनी यासंदर्भातीलू मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सवरून दिली.

ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने या आठवड्यात एक नवीन डेटा जाहीर केला. ब्रिटनमध्ये स्थानिकांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नोकरीनिमित्त जगभरातील अनेक कर्मचारी ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. तसंच, विद्यार्थी व्हिसावर अवलंबून अनेकजण येथे स्थायिक होतात. तेही नोकरी करतात. त्यामुळे येथे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी ब्रिटनने मोठा निर्णय घेतला. त्यानुसार, ब्रिटनने विद्यार्थ्यांवर अवलंबून असलेल्या अर्जांमध्ये काही निर्बंध कडक केले. परिणामी अर्जांमध्ये घट झाली आहे. ब्रिटनच्या ७५ हून अधिक विद्यापीठांमध्ये केलेल्या सर्वेक्षणावर आधारित इव्हनिंग स्टँडर्डच्या अहवालानुसार सप्टेंबर २०२४ साठी ८८ टक्के पदव्युत्तर अर्जांमध्ये घट झाली आहे, जी मागील वर्षाच्या एकूण अर्जांपैकी २७ टक्के कमी आहे.

हेही वाचा >> स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला; पाच गोळ्या झाडल्या, रुग्णालयात उपचार सुरू

जानेवारी २०२४ पासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. नोकरी किंवा शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या व्हिसावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसंच, व्हिसावर राहणाऱ्या लोकांना उच्च पगाराचीही मर्यादा घालण्यात आल्याने हे अर्ज कमी झाले आहेत.

डिसेंबर २०२२ पर्यंत युकेमध्ये ७ लाख ४५ हजार स्थलांतरित होते. तर, जून २०२३ पर्यंत युकेमध्ये जवळपास ६ लाख ७२ हजार स्थलांतरित होते. दर्मयान, २०२४ मध्ये ही संख्या कमी होत राहण्याची सरकारची अपेक्षा आहे.

लंडनमधील एवाय अॅण्ड जे सॉलिसिटरचे संचालक आणि वरिष्ठ इमिग्रेशन असोसिएट यश दुबल म्हणाले, व्हिसाधारकांवर अवलंबून असलेल्यांना ५० टक्के लोकांना व्हिसा मिळत नाही हे खरं आहे. कमी ते मध्यम-कुशल कामगारांना कमी व्हिसा मिळतो.

जानेवारी २०२३ पासून ब्रिटिश गृह कार्यालयाने कुशल कामगार, आरोग्य कामगार आणि आंतरराष्ट्री विद्यार्थ्यांसाठी १ लाख ३९ हजार १०० व्हिसा प्रदान करण्यात आले आहे. मागील बारा महिन्यांत ही संख्या १ लाख ८४ हजार होती.