मध्ये युरोपीय देश स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर बुधवारी (ता.१५ मे) एका व्यक्तीने पाच गोळ्या झाडल्याची घटना घडली. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना पाच गोळ्यापैकी एक गोळी त्यांना लागली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, स्लोव्हाकिया मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर ते जनतेला संबोधित करत असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती सांगितली जात आहे.
पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा आता तपास सुरू असून हल्लेखोर किती जण होते? रॉबर्ट फिको यांच्यावर हल्ला करण्याचमागे काय करणं आहेत? असा सर्व बांजून तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. रॉबर्ट फिको हे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौथ्यांदा स्लोव्हाकियाचे पंतप्रधान झाले. माहितीनुसार, रॉबर्ट फिको हे स्लोव्हाकियामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत.
हेही वाचा : मनी हाइस्टपासून प्रेरणा घेत अंमली पदार्थाची तस्करी; पोलिसांनी असं उघड केलं रॅकेट
पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये रॉबर्ट फिको यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षक गाडीमध्ये बसवत असल्याचं दिसत आहे. तसेच गोळीबाराची घटना घडली त्यावेळी तेथे मोठी धावपळ झाल्याचंही दिसत आहे. स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचा जागतिक अनेक नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. तसेच भारत या कठीण परिस्थितीत स्लोव्हाकियाच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.
रॉबर्ट फिको यांच्यावर हा हल्ला एका ७१ वर्षीय व्यक्तीने केल्याचे वृत्त आहे. रॉबर्ट फिको हे गेल्या ऑक्टोबरमध्ये चौथ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर काही धेयधोरण बदलले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकाकडून सातत्याने टीका होत आहे. रॉबर्ट फिको यांना २०१८ मध्ये एका उच्च-स्तरीय भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाल्यानंतर आणि सरकारविरोधी भावना भडकल्याने राजीनामा द्यावा लागलता होता. मात्र, त्यानंतर ते पुन्हा पंतप्रधान झाले. दरम्यान, रॉबर्ट फिको यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सांगण्यात यते आहे. साडेतीन तासांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर आता रॉबर्ट फिको यांची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती आहे.