अरविंद केजरीवाल शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणा-या समारंभासाठी ‘मेट्रो ट्रेन’ने जाणार आहेत. केजरीवाल यांनी कौशांबीमध्ये आज एका जनता दरबारात सांगितले कि, आमचा पक्ष हा ‘आम आदमी’चा पक्ष आहे आणि ‘आप’चे सर्व आमदारही त्यांच्याचप्रमाणे मेट्रो ट्रेनने शपथविधी सोहळ्याला पोहोचतील.
आपली व्यवस्था पूर्णपणे बारगरळी असून, त्यामध्ये सुधारणेची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच नागरिक आपल्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे येत आहेत, असं केजरीवाल म्हणाले. लोकांच्या ‘आप’कडून भरपूर अपेक्षा आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे, असंही ते पुढे म्हणाले. दरम्यान, ९० टक्के समस्या या स्थानिक असून त्याचे समाधान मुहल्ला सभांद्वारे केले जाऊ शकते, असा विश्वास केजरीवाल यांना आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal to ride metro to swearing in