दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबतची आपात्कालीन लष्करी संपर्क यंत्रणाच तोडून टाकल्यामुळे दोन्ही देशांमधील संवाद खुंटला आहे. त्यामुळे या देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
उत्तर कोरियाने दोन्ही देशांमध्ये संवादासाठी वापरण्यात येणाऱ्या रेड क्रॉस आपात्कालीन संपर्क यंत्रणा खंडित केल्यानंतर लागलीच लष्करी पातळीवरील आपात्कालीन संपर्क यंत्रणाही तोडून टाकली आहे.
दोन्ही देशांमध्ये कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये संवाद साधण्यासाठी लष्करी संपर्क यंत्रणेची गरज नसल्याचे उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याला सांगितले, असे उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्त संस्थेने म्हटले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-03-2013 at 02:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Battle will start any time between south and north koria