आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पन यांना अटक झाल्यानंतर श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. श्रीनिवासन यांनी स्वेच्छेने राजीनामा न दिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ‘पीटीआय’ने दिलीये.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयमधील एका गटाने श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. गुरुनाथ मयप्पन यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर मयप्पन यांची भेट घेण्यासाठी श्रीनिवासन शनिवार सकाळी मुंबईला रवाना झाल्याचे समजते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-05-2013 at 12:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci mulls sacking srinivasan if he doesnt resign pti sources