मंगळवारी सकाळी झालेल्या मोठ्या स्फोटानंतर बिहारच्या बांका जिल्ह्यातील मदरश्याजवळील इमारतीचा भाग कोसळला आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. नवटोलिया भागातील मशिदीजवळील मदरशाशेजारील खोलीत हा स्फोट झाल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोट इतका जोरदार होता की या इमारतीचा एक भाग रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडला होता. यामध्ये मदरश्याचे मोठे नुकसान झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्फोटानंतर गावात भीतीचे वातावरण

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच दिवसांपासून बंद असणाऱ्या मदरशाजवळील खोलीत हा स्फोट झाला. हा स्फोट बॉम्बस्फोटाचामुळे झाली की सिलिंडरचा स्फोटामुळे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला बोलावले आहे. त्याठिकाणी श्वानपथकही तैनात करण्यात आले आहे. घटनेनंतर गावामध्ये दहशत पसरली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर संपूर्ण परिसरात धूराचे लोट पहायला मिळाले. मदरश्याजवळील इमारतींना स्फोटानंतर कोणतीही हानी झालेली नाही.

“लॉकडाऊनमुळे मदरसा सुरु नव्हता. आम्ही एफएसएल टीम आणि बॉम्ब पथक घटनास्थळी येण्याची वाट पाहत आहोत. या ठिकाणी कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. स्फोटाचे कारण अद्याप सापडलेले नाही,” अशी माहिती बांकाचे पोलीस अधीक्षक अरविंद गुप्ता यांनी दिली.

दरम्यान, स्फोटानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बांका येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी स्फोटस्थळी उपस्थित आहेत. घटनेची सखोल चौकशी केली जात असून स्थानिकांकडून माहिती घेतली जात आहे. तसेच नागरिकांना घाबरू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar a part of the building collapsed due to a big explosion in the room next to the madrasa abn