पीटीआय, भोपाळ : मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबात एक नोकरी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे. चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार बेरोजगारीचा मुद्दा हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्ष काँग्रेस सतत करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘राज्यातील लोकांच्या जीवनातील अडचणी मी दूर करीन. आम्ही पुन्हा सत्तेवर आलो, तर प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार दिला जाईल, जेणेकरून त्यांना स्थलांतर करावे लागणार नाही. बचत गटामार्फत असो, उद्यम क्रांती योजनेमार्फत किंवा सरकारी नोकऱ्यांतून, प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी दिली जाईल,’ असे अलीराजपूर या आदिवासीबहुल जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना चौहान म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेबाबत विचारले असता, अशी वक्तव्ये केवळ युवकांची दिशाभूल करण्यासाठी केली जातात, असे प्रदेश काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष के.के. मिश्रा म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp promise to provide a job available in every family in madhya pradesh ysh