पाकिस्तानातील रेल्वेच्या जाळ्याचा दर्जा वाढवणे आणि इराणला जोडणारी महत्त्वाची वायुवाहिनी (गॅस पाइपलाइन) उभारण्यासाठी चीन त्या देशात ८.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांची दर्जावाढ करण्याचा अधिकार असलेल्या पाकिस्तानातील ‘सेंट्रल डेव्हलपमेंट वर्किंग पार्टी’ (सीडीडब्ल्यूपी)ने बुधवारी १० अब्ज अमेरिकी डॉलर्स खर्चाच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली. यापैकी प्रत्येक प्रकल्पाच्या ८५ टक्क्यांइतकी (साडेआठ अब्ज डॉलर्स) रक्कम चीन कर्ज म्हणून देणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese investment in pakistan