पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदानी समूहाच्या गौतम अदानी यांचे मोठे भाऊ विनोद अदानी यांची अदानी समूहाच्या ‘दुष्कृत्यां’मध्ये ‘मध्यवर्ती भूमिका’ होती, असा आरोप काँग्रेसने केला आहे. विविध तपास यंत्रणांचा राजकीय पक्ष, माध्यमे आणि दबावापुढे न झुकणाऱ्या व्यावसायिकांविरोधात मुक्तपणे वापर केला जातो, त्याच तपास यंत्रणा विनोद अदानींची चौकशी करणार की नाही, असा प्रश्न पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विचारला आहे.

काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात येणाऱ्या ‘हम अदानी के है कौन’ या प्रश्नमालिकेचा भाग म्हणून जयराम रमेश यांनी ट्वीट करून प्रश्न विचारले आहेत. विनोद अदानी हे अदानी समूहाच्या कोणत्याही सूचिबद्ध कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत नाहीत, अशी माहिती अदानींतर्फे देण्यात आली होती. मात्र ही माहिती चुकीची असल्याचा आरोप रमेश यांनी केला. विनोद अदानी हे अदानीच्या एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये अब्जावधी डॉलर कर्ज पाठवण्याचे काम करत असत, या व्यवहारांची सेबी आणि ईडीतर्फे चौकशी का नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या घुसखोरीप्रमाणेच याही मुद्दय़ावर मौन साधले आहे, म्हणून आम्ही प्रश्न विचारायचे थांबणार नाही, असे ट्वीट जयराम रमेश यांनी केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress asked prime minister narendra modi why there was no investigation by sebi ed into vinod adani misdeeds amy