देशात करोना संसर्गाचा दर कमी झालेला दिसत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता आणखी कमी होऊन फक्त २ लाख ३० हजारांवर आली आहे. याशिवाय भारतात करोना संसर्गाचा कहर आता बराच कमी झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी करोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये १८,१६६ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर २१४ करोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. त्याचवेळी, गेल्या २४ तासांमध्ये २३६२४  रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात शनिवारी १८,१६६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २३,६२४  रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर शनिवारी दिवसभरात २१४ करोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर करोनाच्या सुरुवातीपासून देशात एकूण तीन कोटी ३९ लाख ५३ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ५० हजार ५८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३२ लाख ७१ हजार लोक बरे झाले आहेत. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे दोन लाख आहे. एकूण २ लाख ३० हजार ९७१ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, भारतात शनिवारी १२,८३,२१२ करोना चाचण्या करण्यात आल्या. देशात एकूण ५८,२५,९५,६९३ नमुने चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत भारतात ९४.७० कोटी लोकांचे करोना लसीकरण करण्यात आले आहे. देशातील साप्ताहिक सकारात्मकता दर १.५७ टक्के आहे, जो गेल्या १०७ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. देशात संक्रमणाचा दररोजचा दर १.४२ टक्के नोंदवला गेला, जो गेल्या ४१ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 update in india coronavirus deaths active cases vaccinations abn 97