Devinder Singh alias Bunty Chor arrested : दिल्लीसह देशभरात ५०० हून अधिक चोऱ्या आणि घरफोडीच्या घटनांमधील प्रमुख आरोपी देविंदर सिंग उर्फ सुपर चोर ऊर्फ बंटी ऊर्फ बंटी चोर (५३) पुन्हा एकदा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी तब्बल ५०० किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करून कानपूरमधून त्याला अटक केली. ग्रेटर कैलाश येथे १२ एप्रिलच्या रात्री त्याने दोन घरफोड्या केल्या. एक फ्लॅट आणि एका गेस्ट हाऊसमध्ये त्याने चोरी करून तो फरार झाला होता. त्यानंतर ५०० किलोमीटरपर्यंत पोलिसांनी त्याचा पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३० वर्षात तिसऱ्यांता बंटी चोरी पोलिसांच्या तावडीत सापडला. हा बंटी चोर मार्चमध्येच १० वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता. देविंदर सिंगकडून चोरीचा लॅपटॉप, तीन मोबाईल आणि पाच एलसीडीसह चोरीचं इतर साहित्य ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी अडकवलेली हातकडी तो अवघ्या काहीच मिनिटात उघडू शकतो. त्याच्या आयुष्यावर आधारित ‘ओये लकी लकी ओये’ हा हिंदी चित्रपटही येऊन गेला आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांने सांगितलं की, ‘बंटी चोर’ने २०१२ पर्यंत ५०० हून अधिक घरफोड्या केल्या आहेत. यापूर्वी देविंदर सिंगने अनेक राज्यांच्या पोलिसांना चकमा दिला आहे. देविंदर सिंगने १९९३ पासून घरफोड्या करायला सुरुवात केली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी चोरने ग्रेटर कैलाश-२ मधून चोरलेल्या तीन मोबाईल फोनपैकी एक फोन तो बंद करू शकला नाही. या फोनमुळे पोलिसांनी बंटी चोरचं ठिकाण शोधून काढलं. पोलिसांनी त्याचा आग्रा, इटावा, कानपूरपर्यंत पाठलाग केला आणि शेवटी कानपूर देहात अकबरपूर येथे त्याची कार अडवली.

पोलिसांनी कार अडवल्यानंतरही बंटी चोर घाबरला नाही उलट त्याने पोलीस असल्याचं सोंग करून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कानपूर पोलीसही तिथे हजर असल्याने बंटी चोरने सांगितलेली ओळख खोटी सिद्ध करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या कारमधून चोरीचा बराचसा मालही जप्त करण्यात आला आहे.

बंटीच्या आयुष्यावर बॉलिवूड चित्रपत

‘ओये लकी, लकी ओये’ हा लोकप्रिय हिंदी चित्रपट ‘बंटी चोर’च्या जीवनावरून प्रेरित होता, असं सांगितलं जातं. तसेच ची लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉसचाही भाग होता. बंटीविरोधात देशभरात ५०० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. एकट्या दिल्ली शहरात त्याच्याविरोधात ३०० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

हे ही वाचा >> भाजपात एकवाक्यता नाही? बावनकुळेंचा राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याला विरोध; तर मुनगंटीवार म्हणाले…

पाल खाऊन तुरुंगातून फरार झाला

पोलिसांनी सांगितलं की, बंटी चोर इतका पोहोचलेला माणूस आहे की, त्याने चेन्नईच्या तुरुंगातून पळून जाण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मग त्याने तिथे एक पाल खाल्ली, त्यामुळे त्याला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. मग बंटी चोर रुग्णालयातून फरार झाला. त्यानंतर तो अनेक वर्ष पोलिसांना चकमा देत होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Davinder singh alias bunty chor held from lucknow in more than burglary asc