बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना पुढील आयुष्यात पत्रकार व्हावयाचे आहे. पत्रकारांना असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याकडे बच्चन आकर्षित झाले असून पुढील आयुष्यात पत्रकार होण्याची इच्छा असल्याचे तेच मुख्य कारण असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. पुढील आयुष्य, अर्थातच पत्रकार, कारण त्यांना कोणत्याही दडपणाविना अथवा परिणामांची तमा न बाळगता बोलण्याचे आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असते. सध्या अमिताभ बच्चन हे भोपाळमध्ये ‘सत्याग्रह – डेमोक्रसी अण्डर फायर’ या राजकीय चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी येथे आले आहेत. या चित्रपटात बच्चन यांच्यासमवेतच अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन रामपाल आणि मनोज वाजपेयी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-03-2013 at 04:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desire to become journalist future life