फेसबुकच्या सुमारे ८७ मिलियन (८.७ कोटी) युजर्सचा डेटा केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने लीक केल्याची शक्यता फेसबुकने व्यक्त केली आहे. यापूर्वी हा आकडा ५ कोटी असल्याचे सांगण्यात येत होता. परंतु, बुधवारी फेसबुकनेच याबाबत माहिती दिली. ब्रिटनमधील राजकीय सल्लागार कंपनी असलेल्या केंब्रिज अॅनालिटिकाने गैरमार्गाने हा डेटा पळवल्याचे फेसबुकचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या ८७ मिलियन युजर्सपैकी बहुतांश युजर्स हे २०१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय होते, अशी माहिती फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माइक स्क्रूफेर यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिली आहे. युजर्सचा डेटा थर्ड पार्टी अॅप डेव्हल्परपर्यंत जाऊ नये म्हणून फेसबुककडून योग्य ते पाऊल उचलले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया कंपनी असलेल्या फेसबुकला सध्या युजर्सच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने फेसबुक युजर्सची माहिती वापरली होती. हे प्रकरण उजेडात आल्यापासून युजर्स, जाहिरातदार आणि कायदेतज्ज्ञांनी देखील फेसबुकवर टीका केली होती. कोट्यवधी युजर्सचा डेटा चुकीच्या पद्धतीने केंब्रिज अॅनालिटिकाच्या हाती पडल्याचे फेसबुकने गत महिन्यात कबूल केले होते.

सुख मे सब साथी : फेसबुक डेटा चोरीप्रकरणी मार्क झुकेरबर्ग पडला एकाकी

बुधवारी फेसबुकचे शेअर्स १.४ टक्क्यांनी घसरले. केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण जाहीर झाल्यापासून शेअर्समध्ये सुमारे १६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. यापूर्वी ५ कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, केंब्रिज अॅनालिटिकाने मात्र हा आरोप फेटाळला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook says data of 87 million people may have been shared with cambridge analytica