गुजरातमधील जातीय दंगलींना कारणीभूत ठरलेल्या फेब्रुवारी २००२ च्या गोध्रा रेल्वे जळीतकांड प्रकरणातील ३१ दोषींपैकी एक असले्लया फारुखला सर्वोच्च न्यायालयाने अखेर आज(गुरुवार) जामीन मंजूर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोध्रा हत्याकांड प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या फारुखला सर्वोच्च न्यायालायाने हा विचार करून जामीन मंजूर केला, की त्याने आधीच १७ वर्षे शिक्षा भोगली आहे आणि रेल्वेवर दगडफेक करणाऱ्यांमध्ये तो होता.

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि जस्टिस पीएस नरसिंम्हा यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित अपीलमध्ये दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जावर हा आदेश दिला. त्यांनी सांगितले की, आरोपी १७ वर्षांपासून तुरुंगात आहे आणि रेल्वेवर दगडफेक करण्यात त्याची भूमिका होती.

जामीन आदेश देताना म्हटले की… –

“प्रकरणातील तथ्यांमध्ये आरोपी क्रमांक ४, फारुख यांने दाखल केलेल्या जामीन अर्जाला परवानगी आहे. अर्जदाराला कलम ३०२ आयपीसी अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने ९ ऑक्टोबर २०१७ रोजी त्याचे अपील फेटाळण्यात आले होते. अर्जदाराने या आधारावर जामीन मागितला आहे की, तो २००४ पासून कोठडीत असून १७ वर्षे तुरुंगवास भोगलेला आहे. खटल्यातील वस्तुस्थिती, परिस्थिती आणि अर्जदाराची भूमिका लक्षात घेऊन, आम्ही निर्देश देत आहोत की, अर्जदाराला सत्र न्यायालयाद्वारे लागू केल्या जाणाऱ्या अटी व नियमांच्या अधीन जामीन दिला जावा.” असे जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Godhra riots accused who pelted stones on railway granted bail by supreme court after 17 years msr