पीटीआय, गांधीनगर
मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की नरेंद्रभाई मोदी हे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान, आमचे प्रिय नेते आणि सध्याच्या काळात महान जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. ते भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत.ह्णह्णपरदेशातील माझे मित्र मला विचारतात की लाखो भारतीय ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा घोषणा देत आहेत त्याचा अर्थ काय आहे? मी त्यांना सांगतोयाचा अर्थ असा, की भारताचे पंतप्रधान त्यांच्या दूरदृष्टीने, दृढनिश्चयाने अशक्य ते सर्व शक्य बनवतात.
‘व्हायब्रंट गुजरात’ सर्वात महत्त्वाची गुंतवणूक परिषद’२०४७ पर्यंत भारताला ३५,००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. यावेळी अंबांनींनी ‘व्हायब्रंट गुजरात’चे वर्णन सर्वात महत्त्वाची-प्रतिष्ठित गुंतवणूकदार परिषद असे केले. मोदी राज्याचे मुख्यमंत्री असताना सुमारे दोन दशकांपूर्वी ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट’ सुरू करण्यात आले होते.
मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे. ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील. – मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स उद्योगसमूह