माणुसकी दाखवणारा व्हिडीओ! रुग्णालयात असहाय्य स्थितीत पडलेल्या मुलाला पाहून महिला अधिकाऱ्याला अश्रू अनावर | Lucknow Divisional Commissioner Roshan Jacob breaks down while meeting injured child sgy 87 | Loksatta

माणुसकी दाखवणारी घटना! रुग्णालयात असहाय्य स्थितीत पडलेल्या मुलाला पाहून IAS अधिकाऱ्याला अश्रू अनावर, पाहा VIDEO

रुग्णालयात खाटेवर असहाय्य स्थितीत पडलेल्या मुलाला पाहून महिला अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी

माणुसकी दाखवणारी घटना! रुग्णालयात असहाय्य स्थितीत पडलेल्या मुलाला पाहून IAS अधिकाऱ्याला अश्रू अनावर, पाहा VIDEO
अपघातात जखमी झालेल्या मुलाला पाहून अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी

उत्तर प्रदेशातील लखीमपूऱ खेरी येथे ट्रक आणि बसमध्ये झालेल्या धडकेत १० लोकांचा मृत्यू झाला, तर ४१ लोक जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, १२ जणांना लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. लखनऊच्या विभागीय आयुक्त रोशन जॅकब यांनी रुग्णालयात जखमींच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते.

रोशन जॅकब यांचा रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामध्ये त्या जखमी झालेल्या मुलाची चौकशी करत असून डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्यास सांगताना दिसत आहेत.

डॉक्टरांशी चर्चा करतानाही त्या सतत आपले डोळे पुसत होत्या. यावेळी त्यांनी वेदना सहन होत नसल्याने रडणाऱ्या मुलाला धीर देण्याचाही प्रयत्न केला.

जॅकब या २००४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. लखनऊमध्ये दोन आठवड्यांपूर्वी पाणी साचलेल्या रस्त्यांची पाहणी केल्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग ७३० वर हा अपघात झाला. लखनऊला निघालेल्या बसचा समोरुन येणाऱ्या ट्रकशी धडक होऊन हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनीदेखील अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मोदींनी दोन लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“भारतातील ‘या’ राज्यांमध्ये प्रवास करू नका”, कॅनडाचा आपल्या नागरिकांना अजब सल्ला; सुरक्षेचं दिलं कारण!

संबंधित बातम्या

“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!
लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता
Hijab Ban: इराणमधल्या महिलांच्या हिजाब सक्तीविरोधातील संघर्षाला यश; ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’चा गाशा गुंडाळला
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून डॉ. रोहित शिंदे बाहेर; इतर स्पर्धक झाले भावुक
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?
‘छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची चुकीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’; खासदार श्रीकांत शिंदे यांचा इशारा
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी