टीम इंडियाच्या भगव्या रंगाच्या जर्सीवरुन जोरदार राजकारण सुरु आहे. पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी भगव्या रंगाच्या जर्सीच्या टि्वटवरुन पलटी मारली आहे. भगव्या जर्सीवरुन आपण विनोद केला होता असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने काल भारताचा पराभव केला. स्पर्धेतील भारताच्या या पहिल्या पराभवाला नवीन भगवी निळी जर्सी कारणीभूत आहे असे टि्वट मेहबुबा मुफ्ती यांनी केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेहबुबा मुफ्ती यांच्या या टि्वटचा सोशल मीडियावर जोरदार समाचार घेण्यात आल्यानंतर त्यांनी हे टि्वट आपण विनोदाने केले होते असे म्हटले आहे. आपल्या टि्वटचे समर्थन करताना मेहबुबा मुफ्ती यांनी एका भाजपाच्या नेत्याच्या वादग्रस्त टि्वटचा दाखला दिला आहे.

भाजपा नेता हिंदुंना मुस्लिम महिलांवर सामूहिक बलात्कार करण्याचे आव्हान करतो पण त्या विधानापेक्षा  मी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल विनोदी अंगाने केलेल्या टि्वटची जास्त चर्चा होते. अशी धक्कादायक विधाने जाणीवपूर्व दाबली जातात का? एका साध्या टि्वटवर इतक्या कठोर प्रतिक्रिया येतात पण भाजपा नेत्याच्या टि्वटवर संताप का व्यक्त होत नाही? असा सवाल मेहबुबा मुफ्ती यांनी विचारला आहे.

मला अंधश्रद्धाळू म्हटलात तरीही हरकत नाही मात्र भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच टीम इंडियाला रविवारच्या इंग्लंडविरोधातल्या सामान्यात हार पत्करावी लागली या आशयाचं ट्विट महबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. आत्तापर्यंत विश्वचषक सामन्यात भारताने एकही पराभव सहन केला नव्हता. रविवारी झालेल्या सामन्यात मात्र टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्याला भगव्या रंगाची जर्सी कारणीभूत ठरली असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mehbooba mufti calls saffron jersey tweet a joke dmp