श्रीनगरमधील खानयार भागात आज पोलीस टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला. या जवानांच्या छातीवर गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. तर, जखमी जवानाला स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी संबंधित परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
Jammu and Kashmir | One police personnel injured in the terrorist attack on a police party at Khanyar in Old Srinagar city
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/dqlHeZbclv
— ANI (@ANI) September 12, 2021
दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमधील छानापोरा भागात तैनात असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता.
जम्मू-काश्मीर : जवानांवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला!
त्या अगोदर भारतीय लष्कराने जम्मू -काश्मीरच्या पुंछ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला होता. पहाटे लष्कराला नियंत्रण रेषेजवळ तीन ते चार दहशतवाद्यांचा एक गट दिसला. त्यांच्यापैकी एक जण सीमा ओलांडून भारतात शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात तो घुसखोर ठार झाला होता.