पाकिस्तानचे माजी अध्यभ परवेझ मुशर्रफ यांना पुन्हा पाकिस्तानमध्ये परतल्यास तालिबानी दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुशर्रफ यांना मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ तालिबानी दहशतवाद्यांनी जारी केला आहे. यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, “मुशर्रफ पाकिस्तानमध्ये पुन्हा परतल्यास त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना नरकात पाठविण्यात येईल. त्यासाठी विशेष पथक तयारसुद्धा केले आहे. की जे मुशर्रफ यांच्यावर हल्ला करेल.” उद्या(रविवार) परवेझ मुशर्रफ पाकिस्तानात परतणार आहेत. ते सध्या दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. तब्बल चार वर्षांनंतर आपल्या मायदेशी म्हणजे पाकिस्तानात  परतणार असल्याचे मुशर्रफ यांनी स्पष्ट केले होते. परंतु तालिबान दहशतवद्यांकडून आलेल्या या धमकीमुळे त्यांच्या पाकिस्तान परतीबद्दल शंका निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan taliban threaten to send musharraf to hell when he returns