पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत शनिवारी प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ करण्यात आली. ही वाढ शनिवारी मध्यरात्रीपासून लागू होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने गेल्या महिनाभरात झालेली ही दुसरी भाववाढ आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३.१८ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३.०९ रुपये इतकी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरत असल्याने देशांतर्गत बाजारातही इंधनाच्या दरांत वेळोवेळी घट करण्यात आली. गेल्या वर्षांत पेट्रोलचे दर एकूण १७.११ रुपयांनी घटले होते तर डिझेलचे दर एकूण १२.९६ रुपयांनी घटले होते. मात्र फेब्रुवारीमध्ये दर वाढवण्यात आल्याने हा कल बदलला. यापूर्वी १६ फेब्रुवारीला दर वाढवले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-03-2015 at 01:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel prices hiked