रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कारांचे दिल्लीत अरुण जेटली यांच्या हस्ते वितरण
देशाच्या पत्रकारितेत आपल्या दर्जेदार योगदानातून भर घालणाऱ्या वार्ताहरांचा आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कार देऊन गौरव केला जाईल. एक्स्प्रेस वृत्तसमूहातर्फे दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मोजक्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदा या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता आमीर खान याची प्रमुख उपस्थिती असेल.
मुद्रित आणि दृक्श्राव्य माध्यमातील उत्कृष्ट वार्ताकनासाठी २०१३-१४ या वर्षांसाठीचे १५ गटांत पुरस्कार दिले जातील.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. ए. श्रीकृष्ण, एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख, एशियानेट टीव्ही चॅनेलचे संस्थापक आणि एशियन स्कूल ऑफ जर्नालिझमचे अध्यक्ष शशी कुमार, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी आणि पत्रकार व इंडियन काऊन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या वरिष्ठ फेलो (संशोधक) पोमेला फिलिपोज यांच्या समितीने विजेत्यांची निवड केली आहे.
सर्वच प्रवेशिका उत्कृष्ट दर्जाच्या होत्या. केवळ उच्चभ्रू वर्गाचे प्रश्न न मांडता देशातील कानाकोपऱ्यातील सामान्य जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या आणि खऱ्या पत्रकारितेचे दर्शन घडवणाऱ्या होत्या. त्यातून सर्वोत्कृष्ट वार्ताकनांची निवड करणे खरोखरच आव्हानात्मक होते, असे मत बहुतेक परीक्षकांनी मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramnath goenka excellence in journalism award a day to celebrate the finest in indian journalism