तामिळनाडूतील कुंदनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याचे वृत्त निराधार असल्याचे भारताने स्पष्ट केलेले असतानाच अद्याप कार्यान्वित न झालेल्या या प्रकल्पातून २७ फेब्रुवारीपासूनच किरणोत्सर्ग होत असल्याचा आरोप श्रीलंकेतील एका गटाने केला आहे.
‘द पीपल्स मूव्हमेण्ट अगेन्स्ट कुंदनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लाण्ट’ने अधिकाऱ्यांना येथे येऊन किरणोत्सर्ग होत असल्याची खातरजमा करून घेण्याचे आवाहन केले आहे. कुंदनकुलम प्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल या गटाने श्रीलंका सरकारला जबाबदार धरले आहे.
कुंदनकुलम प्रकल्प कार्यान्वित करणे हा प्रकार भारत आणि श्रीलंकेतील मच्छीमार, कृषी आणि व्यापार क्षेत्रातील बाधित लोकांनी केलेल्या निदर्शनाच्या विरोधातील कृती ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे. गेल्याच आठवडय़ात भारतीय अधिकाऱ्यांनी या प्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याच्या वृत्ताचे जोरदार खंडन केले होते.
श्रीलंकेतील विविध गटांनी अलीकडेच कुंदनकुलम प्रकल्पाबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली होती.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2013 रोजी प्रकाशित
कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग?
तामिळनाडूतील कुंदनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याचे वृत्त निराधार असल्याचे भारताने स्पष्ट केलेले असतानाच अद्याप कार्यान्वित न झालेल्या या प्रकल्पातून २७ फेब्रुवारीपासूनच किरणोत्सर्ग होत असल्याचा आरोप श्रीलंकेतील एका गटाने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-03-2013 at 04:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readition from kundankulam atomic energy project