माझ्या पंधरा वर्षांच्या खासदारकीच्या काळात कोणाचीही जात काढली नाही. पण शरद पवार हे जातीचं राजकारण करतात, अशा शब्दांत शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आढळराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी पुणे शहरातील रास्ता पेठ येथील नरपितगिरी चौकात सभा घेण्यात आली. यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर आढळराव पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना अनेक प्रश्नावर भुमिका मांडली.

आढळराव पाटील म्हणाले, मी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाबाहेब ठाकरे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी जातीपतीच्या राजकारणापासून दूर असून माझ्याकडून असे काहीही होणार नाही. मात्र, स्वतःला पुरोगामी म्हणणारे शरद पवारांचे राजकारण हे जातीचे राजकारण करतात असा आरोप त्यांनी यावेळी केला.

मागील तीन निवडणुकापेक्षा यंदा मी सर्वाधिक मतांनी निवडून येईल असा विश्वास यावेळी अढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar politics of caste the allegations are made by the adhalrao patil