बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी याचे वडील अरविंद जोशी यांचं आज सकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अरविंद जोशी यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेते परेश रावल यांनी ट्वीट करत अरविंद यांच्या निधनाची माहिती दिली. ‘भारतीय रंगभूमीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मला सांगताना दु:ख होत आहे की, अभिनेते अरविंद जोशी यांचे निधन झाले आहे,’ असं म्हणत त्यांनी ही दुःखद वार्ता दिली.

अरविंद जोशी यांनी गुजरातीमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये तसेच नाटकांमध्ये काम केलेलं आहे. गुजराती नाटकांमधून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. गुजरातीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही त्यांनी काम केलं. ‘इत्तेफाक’, ‘शोले’, ‘अपमान की आग’, ‘खरीदार’, ‘ठिकाना’, ‘नाम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहकलाकार म्हणून काम केले आहे. त्यांनी हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharman joshi father gujarati actor arvind joshi passes away avb