गळफास लावलेल्या अवस्थेत झाडाला लटकलेल्या दोन मुलींचे मृतदेह त्यांच्या घराजवळच आढळून आले आहेत. नोएडातील सेक्टर ४९ मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सगळा प्रकार ऑनर किलिंगचा असावा असा संशय पोलिसांना आहे. एका मुलीचे वय १८ तर एका मुलीचे वय १३ वर्षांचे आहे अशीही माहिती समोर आली आहे. या दोन्ही हत्यांमागे आमचे काही नातेवाईक असू शकतात अशी शक्यता या मुलीच्या आई वडिलांनी वर्तवली आहे. पोलिसांना या दोन्ही मुलींच्या मृतदेहांवर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत. मात्र त्यांची हत्या करण्यात आली आहे हे मृतदेहांची अवस्था पाहून समजते आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राथमिक तपासात या दोन्ही आत्महत्या आहेत असे वाटते. मात्र या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी यामागे इतर काही नातेवाईकांचा हात असल्याचे म्हटले आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नाकावर असलेल्या एका जखमेचा अपवाद वगळता दोघींच्याही मृतदेहावर कसलीही खूण नाही. कौटुंबिक वादामुळे रवि नावाच्या नातेवाईकाने या दोघींची हत्या केली असावी असा संशय या मुलींच्या पालकांनी व्यक्त केला आहे. सोमवारी रविच्या कुटुंबाने आम्हाला ठार करण्याची धमकीही दिली होती असेही या मुलींच्या पालकांनी म्हटले आहे. या दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या हत्यांमागे कोण आहे? हा ऑनर किलिंगचा प्रकार तर नाही ना? या सगळ्याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two girls found hanging from a tree in noida parents suspect honour killing