अयोध्येमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे झटके बसल्याची माहिती समोर येत आहे. नॅशनल सेंटर फॉर समीस्मोलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता ४.३ इतकी होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनसीएसने दिलेल्या वृत्तानुसार या भूकांपाचा केंद्रबिंदू अयोध्येच्या उत्तर आणि ईशान्येकडे १७६ किलोमीटरवर होता. नेपाळमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमीनीखाली १५ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे हदरे बसले.

“४.३ रिस्टर स्केअलचा भूकंप ६ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११ वाजू ५९ मिनिटं आणि २२ सेकंदांना लॅटीट्यूड २८.१४ आणि लॉन्जीट्यूड ८३.१४ वर १५ किलोमीटरच्या खोलीवर झाला. हा भूकंप उत्तर प्रदेशमधील अयोध्येपासून १७६ किमी अंतरावर झाला,” अशी माहिती एससीएसने रात्री १ वाजून पाच मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये दिलीय.

या भूकंपामध्ये कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाचे झटके जाणवल्याने काही ठिकाणी नागरिक आपआपल्या घरांच्या बाहेर पळत आल्याची माहिती प्रादेशिक वेबसाईट्सने दिलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh magnitude 4 point 3 earthquake strikes near ayodhya scsg