एक नकार देणं किती महागात पडू शकतं? याचा प्रत्यय एका प्रियकराला आला आहे. प्रेमात नकार दिल्यानंतर प्रेयसीचा गळा चिरणारे अनेकजण असतात. एवढंच काय एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या झाल्याचीही अनेक प्रकरणं आपण वाचली आहेत. मात्र प्रियकराच्या एका नकाराने प्रेयसीचा अहंकार दुखावला आणि तिने प्रियकराचा प्रायव्हेट पार्टच कापला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी काय घडली घटना?

प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातलं नातं जितकं भावनिक असतं तितकंच ते संवेदनशीलही असतं. शारिरीक आणि भावनिकदृष्ट्या हे नातं फुलत असतं. कानपूरच्या चौबेपूर नावाच्या गावात घडलं असं की एका तरुणाचे त्याच गावातील विवाहितेशी प्रेमसंबंध होते. या विवाहितेच्या घरी तिची मैत्रीण आली होती. त्या मैत्रिणीशी ओळख करुन द्यायची म्हणून या विवाहितेने तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलवलं. दोघांची ओळख करुन दिली. त्यानंतर विवाहितेच्या मैत्रिणीने तिच्या बॉयफ्रेंडशी लगट करण्यास सुरुवात केली. तिला त्याच्यासह शरीर संबंध ठेवायची इच्छा होती त्यामुळेच ती जबरदस्तीही करु लागली. मात्र या तरुणाला प्रेयसीच्या मैत्रिणीची ही कृती मुळीच आवडली नाही. त्याने प्रेयसीच्या मैत्रिणीशी शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला. मग काय रागाने लाल झालेल्या प्रेयसीने त्याच्यावर वार करुन त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला. यानंतर हा तरुण जोरात किंचाळला.

या हल्ल्यानंतर काय घडलं?

प्रेयसीने केलेल्या या अचानक आणि तितक्याच भयंकर हल्ल्यामुळे तरुण भांबावला होता. त्याने कसाबसा तिथून पळ काढला आणि घर गाठले. घरी आल्यानंतर त्याची ही अवस्था पाहून कुटुंबीयांनाही धक्काच बसला. या सगळ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. Free Press Journal ने हे वृत्त दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman chops off boyfriend private parts for refusing to have physical relationship with her friend in kanpur scj